Description
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नुकत्याच बदललेल्या परीक्षांचे विहित अभ्यासक्रम व परीक्षा पद्धतीस डोळ्यासमोर ठेवून ‘सिम्प्लिफाईड सायन्स’ हे पुस्तक लिहिण्यात आलेले आहे. सरळसेवेसारख्या सोप्या परीक्षेपासून ते राज्यसेवा किंवा सनदी सेवेसारख्या तुलनेने कठीण परीक्षांमधील विज्ञान घटकाची तयारी करणे या पुस्तकामुळे सहज शक्य आहे.
पाठांचा नैसर्गिक क्रम (उदा. पेशी – पेशीचक्र – ऊती), भौतिकशास्त्र घटकाच्या शेवटी एकाच पाठात सर्व गणितीय उदाहरणे, परीक्षानिहाय गतवर्षांचे प्रश्न आणि कोविड-१९ सारख्या नवीन मुद्द्यांचा समावेश हे या पुस्तकाच्या अनेक महत्वाच्या वैशिष्ट्यांपैकी काही वैशिष्ट्ये होय.
लक्ष्यवेधी वैशिष्ट्ये:
1. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकताच बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT च्या क्रमिक पाठ्यपुस्तकांच्या चौकटीतील अभ्यासविषयांचा काटेकोरपणे समावेश.
2. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सतत बदलत असलेल्या प्रश्नपत्रिकांना डोळ्यासमोर ठेवून पुस्तकाची केलेली मांडणी.
3. परीक्षेत विचारण्यात येणाऱ्या गुणानुक्रमे महत्त्वानुसार विषयाची पाठानुसार मुद्देसूद मांडणी.
4. विद्यार्थ्यांना सहज समजेल अशा सोप्या भाषेत ‘कोविड-१९’ सारख्या नव्या धड्यांचा समावेश.
5. मुलभूत संकल्पनांचे आकृत्या, तक्ते आणि प्रवाहचित्रांसोबत तर्कसंगत मांडणी.
6. भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयाच्या शेवटी भौतिक नियमांवर आधारित गणितांचा आणि रासायनिक सूत्रांवर आधारित अभिक्रियांचा स्वतंत्र पाठ.
7. प्रत्येक पाठाच्या शेवटी थोडक्या शब्दांमध्ये सारांश आणि मागील वर्षांत त्या पाठातील मुद्द्यांवर आयोगाद्वारे विचारण्यात आलेले प्रश्न.
8. जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या तिन्ही विषयांच्या शेवटी प्रत्येकी ५० दर्जेदार सराव प्रश्न.
Reviews
There are no reviews yet.