Description
राज्यसेवा पूर्वपरीक्षा मधील २०० गुणांसाठी असलेला हा विषय आता थोडा वेगळ्या पद्धतीने आपल्या सर्वांसमोर येणार आहे . अभ्यासक्रम तोच मात्र आयोगाने ह्याकडे बसण्याचा दृष्टिकोन बदलला आहे . कदाचित ह्यातून काही विद्यार्थी मित्र CSAT कडे दुर्लक्ष करू शकतात . मात्र casual approach मुळे गाफील राहून नुकसान सुद्धा होऊ शकते हे लक्षात असू द्यावे . UPSC पूर्व परीक्षा पद्धती मध्ये सुद्धा हा बदल ज्यावेळी करण्यात आला त्यानंतर अगदी आतापर्यंत ही अनेक हुशार , मेहनती विद्यार्थी केवळ CSAT मध्ये ६७ मार्क्स सुद्धा न पडल्यामुळे यशापासून वंचित राहिले आहेत . त्यामुळे ह्यामध्ये एक तृतीयांश गुण घेतले तरच सामान्य अध्ययन १ चे गुण गृहीत धरण्यात येतील अथवा आपण स्पर्धेतून बाहेर पडू , हे न विसरता सराव करणे गरजेचे आहे .
ह्या पुस्तकामध्ये आयोगाच्या नवीन पॅटर्नप्रमाणे रचना केलेली असून बुद्धिमत्ता आणि अंकगणित चे केवळ आवश्यक तेवढेच टॉपिक आपण ह्यामध्ये अंतर्भूत केलेले आहेत . त्यासोबतच महत्वाच्या १० विषयांवर आधारित सुमारे १४० पेक्षा जास्त उतारे आपण ह्यामध्ये सरावासाठी दिले आहेत . तसेच निर्णय क्षमतेवर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विस्तृत स्पष्टीकरण सहित पुस्तकामध्ये दिलेले आहेत . सर्व प्रश्नांचा दर्जा हा मागील अनुभव आणि बदलत्या स्वरूपानुसार संमिश्र काठिण्य पातळीचा ठेवण्यात आला आहे .
ह्या पुस्तकाच्या माध्यमातून अभ्यास करून आपल्या सर्वांच्या यशाच्या प्रवासात CSAT अडथळा न ठरता केवळ एक पायरी ठरेल हीच प्रामाणिक ईच्छा .
प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या सर्व मित्रांना हा लेखनप्रपंच अर्पण !!!
पुस्तकाची वैशिष्ट्ये :
1. प्रश्न क्रमांक 1 ते 80 पर्यंत मार्गदर्शन करणारे एकमेव पुस्तक
2. आयोगाच्या धरतीवर आणि बदलत्या स्वरूपानुसार संपूर्ण पुस्तकाची आखणी
3. संकल्पना समजून देण्यावर भर
4. वेळ वाचविण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी नोट किंवा टिप्स
5. आयोगाच्या पॅटर्ननुसार विविध विषयांवरील आकलन क्षमतेवर आधारित 140 पेक्षाही जास्त उतारे
6. तार्किक आणि विश्लेषण क्षमता तसेच अंकगणितीय क्षमता यावर आयोगाने विचारलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने मांडणी
7. निर्णय क्षमतेवर आधारित वेगवेगळ्या केस स्टडीज तसेच त्यांचे विस्तृत स्पष्टीकरण आणि मार्गदर्शन.
Reviews
There are no reviews yet.