Description
CSAT मध्ये यशाचा समानार्थी शब्द म्हणजे ‘ सराव’ . या विषयांमधील सर्वच घटकांमध्ये प्राविण्य मिळवण्यासाठी सराव आणि सराव आवश्यक आहे . विषयाच्या बदलत्या स्वरूपानुसार आपल्याला आता या विषयासाठी खूप सराव करण्याची आवश्यकता उरलेली नाही. कारण आपल्याला केवळ एक तृतीयांश मार्क घेऊन हा पेपर पास करायचा आहे. त्यामुळे हे पुस्तक लिहिण्यामागचा एकमेव उद्देश म्हणजे सर्व परीक्षार्थी मित्रांचा कमीत कमी वेळ घेऊन योग्य पद्धतीने आणि सर्वसमावेशक असा सराव करून घेणे हा आहे .
आम्ही या पुस्तकाला अशा पद्धतीने बनवले आहे की संपूर्ण पुस्तक केवळ 30 तासांमध्ये सोडवून होईल. यामध्ये 40 प्रश्नांची एक टेस्ट ज्यामध्ये 25 प्रश्न आकलन क्षमतेवर आधारित 13 प्रश्न बुद्धिमत्ता आणि अंकगणितावर आधारित तर दोन प्रश्न हे निर्णय क्षमतेवर आधारित असतील. सर्वच प्रश्नांचे विस्तृत असे स्पष्टीकरण सुद्धा यामध्ये दिलेले आहे. वेळेच्या योग्य व्यवस्थापनातून केलेल्या या सरावाद्वारे आपले मार्क आणि आत्मविश्वास दोन्हीमध्ये सुद्धा नक्कीच वाढ होईल.
हे पुस्तक आपल्याला यशापर्यंत घेऊन जाण्यासाठी एक सोबती बनेल अशी अपेक्षा आणि आपणास सर्वांना भरपूर शुभेच्छा !!! लक्ष्यवेधी वैशिष्ट्ये:
1. ४० प्रश्नांची एक प्रमाणे ३० सराव प्रश्नपत्रिका
2. आकलन क्षमता – २५ प्रश्न , बुद्धिमत्ता आणि अंकगणित – १३ प्रश्न आणि निर्णय क्षमता – २ प्रश्न
3. ३० तासांमध्ये पूर्ण पुस्तक सोडवून होईल अशी रचना
4. आयोगाने विचारलेले तसेच त्या धरतीवर प्रश्नांची रचना
5. विस्तृत स्पष्टीकरण.
Reviews
There are no reviews yet.