Description
भारतीय अर्थव्यवस्था या पुस्तकाची १५वी आवृत्ती वाचकांच्या हाती सोपवताना विशेष आनंद होत आहे. अर्थशास्त्र, शिक्षण या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विशेषत: स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक, रमेश सिंग यांचे हे अभ्यासपूर्ण लेखन अर्थशास्त्र विषयातील महत्त्वपूर्ण ऐवज ठरेल याची खात्री वाटते. प्रामुख्याने युपीएससीतर्फे घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना समोर ठेवून प्रस्तुत पुस्तकाची योजना केली आहे. तरीदेखील, राज्य पातळीवरील विविध नागरी सेवा स्पर्धा परीक्षा आणि अन्य परीक्षांकरता देखील हा एक उपयुक्त, परिपूर्ण आणि विश्वासार्ह स्रोत ठरला आहे. भारतीय अर्थव्यवस्था या पुस्तकाची १५वी आवृत्ती देखील अर्थशास्त्र या विषयाची कोणतीही पार्श्वभूमी नसणाऱ्या वाचकांची विषयातील मूलभूत आणि व्यावहारिक पातळीवरील समज विकसित करण्यात तितकेच मोलाचे योगदान देईल, हे निश्चितपणे सांगावेसे वाटते.
या पुस्तकासह, तुम्हाला McGraw Hill Edge- जो एक उच्च गुणवत्तेच्या शैक्षणिक संसाधनांनी युक्त डिजिटल प्लॅटफॉर्म आहे त्यावर तुम्हाला थेट विनामूल्य प्रवेश मिळतो- जो तुम्हाला तुमच्या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करण्यास आणखी सरस ठरवतो.
McGraw Hill Edge प्लॅटफॉर्मवर, तुम्हाला सामाजिक आणि आर्थिक विकास या विषयाचे बहुपर्यायी प्रश्न(MCQs), आदर्श उत्तरे, गतवर्षीचे प्रश्न(PYQs) व त्यांची स्पष्टीकरणासह उत्तरे आणि सराव पेपर्स मिळतात जे सर्व तुमची तयारी वृद्धींगत करण्यासाठी आणि तुम्हाला विजयी सरसता देण्यासाठी उपयोगी ठरतील अशा पद्धतीने या प्लॅटफॉर्मचा आराखडा तयार केलेला आहे. शिवाय, त्याचा मोबाइल आणि वेब ॲप इंटरफेस हा शिकण्याची प्रक्रिया आणखी सोयीस्कर आणि सुगम बनवतो! यावर प्रवेश मिळविण्यासाठी पुस्तकात दिलेल्या सूचनांचे पालन करा.
लक्ष्यवेधी वैशिष्ट्ये:
1. प्रस्तुत पुस्तकातील विषयाची मांडणी आंतरविद्याशाखीय दृष्टिकोण लक्षात घेऊन करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाशी संबंधित बाबींच्या व्यावहारिक बाजू उलगडून सांगण्याकरता ताज्या आणि चालू घडामोडींचा समावेश प्रयत्नपूर्वक करण्यात आला आहे.
2. पुस्तकात नमूद केलेली आकडेवारी ही अलीकडील आणि अद्ययावत आहे. इकॉनॉमिक सर्व्हे २०२२-२३, केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४, इंडिया २०२३, भारत विकास अहवाल २०२२, नीती आयोग आणि केंद्रीय मंत्रालयांचे प्रमुख अहवाल यासारख्या अद्ययावत आधारसामग्री उपलब्ध करून देणाऱ्या अधिकृत स्रोतांमधून ही आकडेवारी घेण्यात आली आहे.
3. नवीन आवृती कृषी, उद्योग आणि सेवा या क्षेत्रांमधील चालू घडामोडींनी सुसज्ज आहे.
4. चलनवाढ, बँकिंग, बाह्य क्षेत्र, ‘वेगवान’ धोरणनीती, परिवर्तनक्षम सुधारणा आणि इतर अनेक विषयांशी संबंधित अद्ययावत माहितीचा गोषवारा यात घेण्यात आला आहे.
5. शिवाय हे पुस्तक डिजिटल पायाभूत सुविधा, सेमिकंडक्टर क्षेत्र, ई-कॉमर्स, डिजिटल वित्तीय सेवा आणि अन्य अनेक नवीन विषयांची ओळख करून देते.
6. पुस्तकात ‘विशेष माहिती’ या भागामध्ये इकॉनॉमिक सर्वे २०२२-२३ आणि केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ यांचा समावेश करण्यात आला आहे.
7. पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोन्ही परीक्षांकरता चालू घडामोडींवर आधारित आणि परीक्षेला साजेसे असे नमूना प्रश्न हे या पुस्तकाचे खास आकर्षण आहे. प्रश्नांसोबत त्यांची उत्तरे आणि स्पष्टीकरणे देखील देण्यात आली आहेत.
8. मूलभूत ‘संकल्पना’ आणि ‘संज्ञा’ वस्तुनिष्ठ आणि व्यापक दृष्टिकोनातून उलगडून दाखविण्याकरता अद्ययावत शब्दकोशाचा समावेश करण्यात आला आहे.
Reviews
There are no reviews yet.