Description
माजिद हुसेन यांच्या भारताचा भूगोल या पुस्तकाची १० वी आवृत्ती म्हणजे भूगोल विषयामधील एक दिशादर्शक पुस्तक आहे. या पुस्तकाचा संदर्भासाठी मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. या पुस्तकामध्ये भौगोलिक रचनेचे, संबंधीत वैशिष्ट्ये आणि मुद्दे यांच्या सहाय्याने व्यापक आणि पद्धतशीर विवेचन करण्यात आले आहे. देशामधील अलीकडचे प्रशासकीय बदल किंवा नैसर्गिक आपत्ती यांची दखल घेऊन १० व्या आवृत्तीमध्ये चालू घडामोडी, माहिती आणि विषयाशी संबंधित नकाशे यांच्या सहाय्याने संपूर्ण सुधारणा करण्यात आली आहे. भरपूर विषयांची सखोल चर्चा करून या आवृत्तीमध्ये एकूण सर्वच समाविष्ट मजकुराचा फेरविचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
भूगोल या विषयामध्ये अग्रस्थानी असणाऱ्या या पुस्तकामुळे वेगवेगळे अभ्यासक्रम आणि त्यांचे प्रकार यांच्यासाठी व्यापक मजकूर उपलब्ध झाला आहे. पदविका आणि पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षणतज्ञ यांच्या कडून संदर्भासाठी या पुस्तकाचा वाढता वापर होतो आहे.
पुस्तकाची वैशिष्ट्ये :
1. सैद्धांतिक संकल्पनांच्या स्पष्ट विवेचनासहित यूपीएससी (केंद्रीय लोकसेवा आयोग) च्या अभ्यासक्रमाचा व्यापक समावेश.
2. नवीन विषय! देशांतर्गत सांडपाणी नि:सारण व्यवस्था आणि दुष्काळाचा सामाजिक – आर्थिक परिणाम.
3. नैसर्गिक संसाधनांचे उत्पादन, उपयोग आणि वितरण याची अद्ययावत माहिती आणि भारतामधील कृषिक्षेत्र, पायाभूत सुविधा आणि उद्योगक्षेत्र याचा विकास यांची माहिती.
4. माती आणि जमीन यांचे विश्लेषण आणि त्यांचा होणारा ऱ्हास.
5. भारतीय विमानवाहतूक उद्योग आणि दिल्ली मेट्रो रेल्वे यांच्याशी संबंधित अलीकडच्या काळामधील घडामोडी.
6. नीती आयोगाची स्थापना, रचना आणि कामगिरी याच्याशी संबंधित अद्ययावत माहिती.
7. भारत – नेपाळ संबंध, भारत – अफगाणिस्तान संबंध, क्वाड देशांशी भारताचे वाढते सहकार्य या संबंधीची माहिती.
8. आपत्तीचे प्रकार आणि आपत्ती व्यवस्थापनासंबंधीची राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मार्गदर्शक तत्वे.
9. प्रत्येक प्रकरणानुसार सरावासाठी अनेक पर्याय असणाऱ्या सुमारे २०० प्रश्नांचा समावेश. मजकुराच्या पुष्ट्यर्थ तक्ते, नकाशे आणि आकृत्यांचा समावेश
Reviews
There are no reviews yet.